पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवाह ....

इमेज
              प्रवाह...                      भूतकाळ,वर्तमान काळ आणि  भविष्य काळ अशा तीन टप्यात आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची विभागणी होते. जिथे वर्तमानकाळ अस्तित्वात आहे  तिथे भूतकाळ न चुकता तयार होत जातो.वर्तमान आणि भूत यांचं अस्तिव टिकून राहण्यासाठी भविष्यकाळाला यावेच लागते.या तिन्हींच्या चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसाला नेमके कुठे असावे याविषयी खात्रीच येत नाही.                                 पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या एकसलग वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.नद्यांचे हे वाहणे हे आपल्या सगक्यांच्या आयुष्यासारखे आहे.उगमापासून ते समुद्रापर्यंत चाललेला हा प्रवास अविरतपणे सुरू असतो.पण या प्रवासाच्या कोणत्या भागाला जगणे म्हणायचे असा प्रश्न आपल्याला वारंवार पडत राहतो.भूतकाळात रममान होऊन तसे काहीच हाती लागत नाही.भविष्यकाळ हातात नसल्याने त्यात गुंग होऊनही हाती काहीच येत नाही .हे सगळे सिध्दांताच्या पातळीवर कुठूनही प्रत्यक्ष जगताना मात्र नेमकेपणाने वळत नाही.                         कुठल्याही नदीच्या प्रवाहात जेव्हा जेव्हा आपण उतरतो तेव्हा तेव्हा ती नदी पुर्णतः नवीनच असते.कालचीच नदी

तोचि एक महा"मानव".....

इमेज
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर...                              "ती शून्यामधली यात्रा |                          वाऱ्यातील एक विराणी ||                    गगनात विसर्जित होता |                           डोळ्यात कशाला पाणी" || “सात कोटी अस्पृश्य आजच्या दिवशी १९५६ साली पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्यांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.” “आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली ‘भीमा’ची गदा