"गड आला पण सिंह गेला": डॉ. नरेंद्र दाभोलकर
या देशाला महाराष्ट्राने फार अनमोल रत्न दिलीत.त्या अनमोल रत्नानीच या देशाला ,या महाराष्ट्राला आकार ,उकार दिला.त्या अनेक रत्नापैकी एक कोहिनूर होता तो म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर . भाषणाची सुरवात कार्ल मार्क्स च्या "धर्म ही अफूची गोळी आहे".असे करून श्रध्दा आणि अंधश्रद्धा यांचा सविस्तर पाढा सादर करत. अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला. अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी डॉ. नरेंद्र दाभोलकर सर्वात धाकटे अपत्यं.डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. पूढे सांगली येथील “विलिंग्डन महाविद्यालया”तून त्यांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यावर डॉ. दाभोलकरांनी सातार