चला झाड होऊया........
चला झाड होऊया..... तीन आठवड्यापूर्वी गावाकडे STबस ने यायचा योग्य आला.हा रस्ता तसा गेली अनेक वर्षे माझ्या पाहण्यातला अन ओळखीचा आहे.यावेळी जाताना सोबत ओळखीचं दुसरं कोणीच नव्हते.सगळे प्रवाशी माझ्यासारखेच प्रवासाला निघाले होते.प्रत्येक जण आपआपल्या मोबाईल मध्ये व्यस्त होता...क्वचितच गप्पा होत होत्या.मग मी सुद्धा बसमधून आजूबाजूला पाहत होतो.सकाळी लवकर निघाल्यामुळे वातावरण एकदम ताजतवानं होतं. त्यामुळे निसर्गाच्या दिवसाची सुरुवात पाहणं हाच माझ्यासाठी एक पर्याय उरला. प्रत्येक गावाच्या रस्त्यावर शेती, छोटी मोठी हॉटेल्स यांच्या बरोबरीने ठळकपणे जाणवणारी एक बाब म्हणजे वडाची झाडे.गेली अनेक वर्षे मी ही झाडे पाहतोय.आज ती पाहताना मनात सहज एक विचार आला की ही झाडे कोणी लावली असतील? किती वय असेल यांचे? अजून किती वर्षे ही टिकतील? विचार करता करता ध्यानात आले की या झाडांचे वय माझ्या आजी आजोबांच्या वयापेक्षा नक्कीच जास्त असेल.पुढे मी हयात नसलो तरी ही झाडे असणारच आहेत. वडाच्या झाडाच्या दीर्घायुष्य असण्याचे नेमकं रहस्य काय? मुळात वडाची झाडे न लावत