पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युगप्रवर्तक छत्रपती......

इमेज
                इतिहासाचा एक आंधळा अभिमान हा एक शाप आहे.तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे.इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे.या भूमिकेतून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे नवल नाही.महाराजांचे चरित्र चिंतन हा अनेकांच्या अभिमानाचा,जिव्हाळ्याचा विषय आहे.अनेक देशभक्त ,समाजसेवक,राजकारणी,संशोधक,आणि आपल्या सारखे जनसामान्य यांना सुद्धा महाराज प्राणप्रिय आहेत याला अपवाद नाही.300 वर्षांपूर्वी महाराजांनी देहत्याग केला तरी त्यांचा किर्तीदेह महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात अजूनही तेजाने तळपतो आहे.          छत्रपती शिवराय यांचे जीवन हे अनेकांच्या जीवनाचे विधान आहे .अनेकांचे ते स्फुर्ती स्थान आहे. या श्रीमंतयोगींचे आज स्मरण करताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.महाराजांचा इतिहास सगळ्याना अगदी तारखेनुसार पाठ आहे.महाराज जन्माला आले ते एका गडावर अन या जगाचा निरोप घेतला तो दुसऱ्या गडावर.महाराष्ट्र्याच्या गडकोटांनी महाराजांच्या आयुष्याला एक भौगोलिक अन सांस्कृतिक विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून दिल.महाराजांच्या जीवनावर अनेकांनी ग्रंथ लिहले,सिनेमे काढले,पुतळे उ