पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"आतला ज्वालामुखी......"

इमेज
"आतला ज्वालामुखी "              संपूर्ण प्रयत्न केले असता यश मिळते अस आपण आजपर्यंत खूपदा ऐकत आलो.पण संपूर्ण प्रयत्न म्हणजे नेमके किती प्रयत्न हे मात्र अचूकपणे सांगितले जात नाही.अर्धवट प्रयत्न केले असता यश मिळत नाही हे ही खरंच आहे.पण आपण करीत असलेले प्रयत्न कोणत्या मर्यादेपर्यंत अपूर्ण असतात आणि कोणत्या मर्यादेनंतर पूर्ण होतात हे समजणे  म्हणजे यशाची गुरुकिल्ली सापडण्यासारखेचं आहे.     आपण इयत्ता 5 पाचवी नंतर भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलो आहेत की पृथ्वी च्या गर्भात अत्यंत तप्त असा शिलारस सदैव फिरत असतो.हा रस सतत पृथ्वी च्या पृष्ठभागावर येण्यासाठी धडपडत असतो.त्यासाठी आतून एकसारखे धक्के देत असतो.जेव्हा त्याचे प्रयत्न यशस्वी होतात तेव्हा तो ज्वालामुखीच्या रूपाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर अवतीर्ण होतो.त्याचे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलेले यशस्वी रूप आपल्याला लाव्हारसाच्या रूपाने दिसते. पृथ्वीच्या आतून ज्वालामुखीच्या रूपाने बाहेर येण्यासाठी तप्त शिलारसाची चाललेली ही धडपड प्रत्येक वेळी यशस्वी होतेच अस नाही. जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हा तो रस आतल्या आतच