पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किंमत...

             किंमत.....                                 खरंतर हा तीन अक्षरी शब्द माणसाला प्रत्येक गोष्टीत जाणीव करून देत असते यासाठी एक उदाहरण पाहू.....     "एक श्रीमंत माणूस एकदा नदी काठावरील एका शंकराच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळात शिरणार तेव्हढ्यात त्यांच्या मनांत आले की समोर नदीचे पात्र आहे त्यात स्नान करून ओलेत्यानी शंकराची पूजा करावी. म्हणून ते चालत नदीकाठाशी आले. काठावर हातपाय धूत असताना त्यांचा तोल गेला आणि ते नदीपात्रात पडले. त्यांना पोहता येत नव्हते. ते ओरडायला लागले. काठावर अनेक लोक होते पण त्यांना वाचविण्यासाठी कोणी पुढे येईना. शेवटी काठावर संध्या करीत असलेल्या एका साधूने हा आरडाओरडा ऐकला. तो साधू धावत त्या काठाजवळ आला. त्याने त्या माणसाला बुडताना पाहिले आणि क्षणार्धात पाण्यात उडी मारली. बुडणार्‍या त्याला धरून काठावर ओढत आणले. आणि त्याचा जीव वाचविला. थोडावेळाने तो श्रीमंत माणूस शुद्धीवर आला. ह्या साधूने आपला जीव वाचविला हे समजताच त्याने खिशात हात घालून नोटांची गठ्ठी बाहेर काढली आणि त्यातील एक रुपयाची नोट साधूच्या हातावर बक्षीस म्हणून ठेवली. हे पाहून आसपासचे लोक

🇮🇳 भारत @75 वर्षे....🇮🇳

इमेज
              भारत @75 वर्षे .....    "हम अपनी जान के दुष्मन को  अपनी जान  कहते है... मोहब्बत  की  इसी मिट्टटी को हिंदुस्तान  कहते   है  |                                भारतीय घटनेच्या  प्रस्तावनेतील  सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही हे  3  शब्द वाचकांच्या  कायम  लक्षात  राहतील.  ही आधुनिक प्रजासत्ताकाची गुणवैशिष्ट्ये  आहेत. अशा  प्रजासत्ताकाची स्थापना  करण्यासाठी  आपण लढा दिला  आणि  आजच्या तारखेला  बरोबर  75 वर्षे  मागे  म्हणजे    15 ऑगस्ट  1947  रोजी  भारताला  स्वातंत्र्य  मिळाले.                           शतकानुशतके  पारतंत्र्यात असणाऱ्या या देशाचे  बहुतेक भाग सार्वभौम  होते..राज्य  सार्वभौम  होते...पण जनता  सार्वभौम  नव्हती .पण आज  आपल्या   या 130 कोटी  लोकसंख्येच्या  देशाने  लोकशाही  , सार्वभौमत्व ,आणि  प्रत्येक  अधिकार  आपल्या  गुणसूत्रामध्ये सामावून, मुरवून घेतला आहे. गेल्या 75 वर्षाच्या प्रवासातील   हे आपले सर्वात मोठे यश आहे. राजेरजवाडयांच्या नंतर  आलेल्या  इंग्रजांच्या  अधिपत्याखाली  त्यापूर्वी ची   काही  हजार वर्षे  घालवलेली  गुलामी जनता  पूर्वीच्य

राजकारणातील पाली.....

इमेज
राजकारणातील पाली....       राज्यात गेल्या महिन्यात नुकतच झालेलं बहुपात्री राजकीय नाटकं घडून सत्तांतर झालं.सत्तांतर आणि त्यापाठोपाठ सरकारवरील विश्वासदर्शक ठरवाकरिता झालेल्या विधानसभाअधिवेशनात सर्व काही प्रयोग झाले.त्यात कोण ,कुठे,कधी जातो हा सस्पेन्स होता, मुंबईतुन सुरत व्हाया गुवाहाटी ला पोहचनाऱ्याचं थ्रिल होतं, तरीही निष्ठावान असल्याचा ड्रॅमा होता,वेष बदलून रात्री घेतलेल्या गुप्त भेटीगाठी होत्या,विधिमंडळ च्या भाषणामध्ये राग दिसत होता,द्वेष होता,कोपरखळ्या होत्या,एकमेकांना केलेल्या रानटी गुदगुल्या होत्या ,माझे कसे सगळेच मित्र आहेत हे सांगणे होतं... सर्व काही आलबेल होत.नव्हता फक्त आपल्या सारख्या सामान्य माणूस आणि त्याचे प्रश्न!                विधांनसभेतल्या प्रत्येक निवड केलेल्या कलाकारांची भाषण ऐकतांना महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या कानाला अटॅक आला असेल हे नाकारता येत नाही.ते ऐकून हे  जाणवत होतं की महाराष्ट्राचे 12 कोटी नागरिक आणि त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचा दुरदूरचा ही आता संबंध उरलेला नसून,अवघ राज्य फक्त ह्या  सत्तेच्या सारीपाटा वर लिलावात निघाल