राजकारणातील पाली.....
राजकारणातील पाली....
राज्यात गेल्या महिन्यात नुकतच झालेलं बहुपात्री राजकीय नाटकं घडून सत्तांतर झालं.सत्तांतर आणि त्यापाठोपाठ सरकारवरील विश्वासदर्शक ठरवाकरिता झालेल्या विधानसभाअधिवेशनात सर्व काही प्रयोग झाले.त्यात कोण ,कुठे,कधी जातो हा सस्पेन्स होता, मुंबईतुन सुरत व्हाया गुवाहाटी ला पोहचनाऱ्याचं थ्रिल होतं, तरीही निष्ठावान असल्याचा ड्रॅमा होता,वेष बदलून रात्री घेतलेल्या गुप्त भेटीगाठी होत्या,विधिमंडळ च्या भाषणामध्ये राग दिसत होता,द्वेष होता,कोपरखळ्या होत्या,एकमेकांना केलेल्या रानटी गुदगुल्या होत्या ,माझे कसे सगळेच मित्र आहेत हे सांगणे होतं... सर्व काही आलबेल होत.नव्हता फक्त आपल्या सारख्या सामान्य माणूस आणि त्याचे प्रश्न!
विधांनसभेतल्या प्रत्येक निवड केलेल्या कलाकारांची भाषण ऐकतांना महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या कानाला अटॅक आला असेल हे नाकारता येत नाही.ते ऐकून हे जाणवत होतं की महाराष्ट्राचे 12 कोटी नागरिक आणि त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचा दुरदूरचा ही आता संबंध उरलेला नसून,अवघ राज्य फक्त ह्या सत्तेच्या सारीपाटा वर लिलावात निघालं आहे.अशी सत्ता जी ज्याच्यासाठी राबवायची आहे ते आणि सर्वसामान्य लोक सोडून त्यांनी निवडून पाठवलेले हे 'कलाकार' फक्त तिचे लाभार्थी झाले आहेत.
राजकारणात तत्व ,नैतिकता, वगैरे यांची अपेक्षा आपण कधीच सोडलेली असली तरी हा खेळ पाहताना "आता मात्र पाणी गळ्याला लागलं आहे !" अशीच भावना आता सामान्य माणसाची झाली आहे. आपण निवडून दिलेलं हे 288 कलाकार वाट्टेल तसं वागू शकतात, सत्तेचा घोडेबाजार भरवू शकतात, जावई सासऱ्यांचे बाष्कळ विनोद करत एकमेकांना प्रश्न विचारत नाही ,नवाच जावई शोध लावू शकतात ,एकमेकांना "सेफ पॅसेज" देतात...हे बघून महाराष्ट्र राज्याची जनता नक्कीच हतबल झाली आहे.
प्रातिनिधिक लोकशाहीत नागरिक हा प्रत्यक्ष फक्त मतदार बनून राहतो, हाच मोठा दोष आहे.जगभरात प्रातिनिधिक लोकशाहीला ही प्रमाणात थेट लोकशाही ची जोड असावी हे सर्वसामान्य आहे. हा विचार भारतात पूर्णपणे उलटा आहे.कारण या देशात लोकशाही ची लोकप्रतिनिधीशाही आणि त्यानंतर पक्षप्रमुखशाही झाली अस आपण म्हणू शकतो.पण हे सत्तांतर त्याच्याही पुढं गेलं असून आपली लोकशाही आता "ईडी शाही" झाली आहे.त्यामुळे ज्याच्या हाती तपास यंत्रणा ,तोच कोणतं सरकार कुठे ठेवायचं अन कुठे पाडायचं हे ठरवणार.
हा भारतीय लोकशाहीचा एक भयंकर टप्पा सुरू झाला आहे. हे नक्की .
हे सगळं पाहिल्यावर एक लहानपणीची गोष्ट मला आठवते. ती भिंतीवरच्या "पाली" ची....... ही पाल मला देशातल्या सगळ्या राजकारण्यांची जन्मदात्री वाटते.ती अशी की...आपण सगळ्यांनीच पाल पाहिलेली असते.ती घरातल्या भिंतीवर ,विशेषतः सरकारी ऑफिसच्या भिंतीवर कीटक,मुंग्या, डास यांना खाऊन जगताना आपल्याला दिसते. तिचं भक्ष्य ती अतिशय चतुरपणे ,सहजपणे लक्ष ठेवून पकडते. त्यामुळे पालीला पाहून घाबरणारी माणसं आपण बरीच पाहिली. तिच्या या वैशिष्ट्य मुळे आपण तिला घाबरतो अन तिच्याकडे दुर्लक्ष करतो.पण ती पाल एवढं कीटक ,मुंग्या खाऊन काय होतं तर तिच्यामध्ये एक प्रकारचा सुस्तपणा येतो.मग हा सुस्तपणा अंगी घेऊन ती पाल महापुरुष यांच्या फोटो मागे,घरातील स्वर्गवासी यांच्या फोटो मागे, तसेच पुतळ्यांच्या मागे 'लपताना' दिसते.ती नेहमी आपलं पोट भरून लपते. तसंच या देशातल्या राजकारण्यांच असतं....त्यांनी अश्या पालींचा "सुप्त गुण" एकजात आत्मसात केलाय.कधी कधी कमाल वाटते ती या राजकारण्यांची.की ही लोकं इतकी हुशार असून पण आपल्या आजूबाजुला असणाऱ्या पाली कडून,सरड्याकडून इत्यादी प्राण्याकडून शिकतात.पण आपल्यासारखे सामान्य लोक या अश्या "अष्टपैलू राजकारणी कलाकाराकडून " काहीच शिकत नाही, म्हणून आज या राज्याची अन देशाची अवस्था आज नको अशी झाली.
अमोल नंदा शिवाजी भोसले.
12 जुलै 2022
स्वार्थ माणसाला तत्वांपासून दूर घेऊन जातो..
उत्तर द्याहटवामग ते सर्वच क्षेत्रात लागू होते..
दुर्दैवानं माणसा मधला माणूस हरवत आहे..
लोक आज संधी बंनवण्यापेक्षा ,संधी साधू बनत आहेत.. जनता प्रत्येकाला आपली जागा नकीच दाखवून देईल..शेवटी सत्यमेव आणि तत्वमेव जयते निश्र्चित होईल..
100 टक्के बरोबर... ty दोस्ता
हटवाEye opening commentary amol, hope there will be light at the end of tunnel
उत्तर द्याहटवाThanks सर👍
हटवा