पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मवीर भाऊराव......

इमेज
                               घरी पाहुणे आलेले असतात.जेवण चालू असते. जेवताना पाहुणे विचारतात मुलगा काय करतो. वडील म्हणतात, "काही नाही खातो पितो गावभर फिरतो ". हे सर्व ऐकत असते जेवण वाढणारी मुलाची बायको.अन वाढताना तिच्या डोळ्यातून अश्रूची धार लागते... त्यातील दोन अश्रू त्या मुलाच्या ताटात नकळत पडतात. तसेच ताट ठेवून तो मुलगा उठतो अन घराबाहेर पडतो... तोच मुलगा बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जीवाचे रान करतो अन "आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था उभारतो".अन त्या मुलाचे नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. #वि. स. खांडेकर म्हणाले होते की "स्त्री चे अश्रू हे  अणुबॉम्ब पेक्षा भयानक अन विध्वसंक असतात". पण कर्मवीर आण्णाच्या पत्नीच्या आसवाने तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली.प्रसंगी या माऊलीने गळ्यातील डोरलं मोडलं.पोरांना जेवू घातलं पण शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. ती आज अखेर...  सध्याच्या सोकोल्ड युगात 'क' कमळाचा नसून "कर्मवीर" भाऊराव पाटील यांचा शिकवण्याची गरज आहे. कर्मवीर हे दलित बांधवांचे,गरीब गरजू कुटुंबाचे,अनाथांचे पा