कर्मवीर भाऊराव......
घरी पाहुणे आलेले असतात.जेवण चालू असते. जेवताना पाहुणे विचारतात मुलगा काय करतो. वडील म्हणतात, "काही नाही खातो पितो गावभर फिरतो ".
हे सर्व ऐकत असते जेवण वाढणारी मुलाची बायको.अन वाढताना तिच्या डोळ्यातून अश्रूची धार लागते... त्यातील दोन अश्रू त्या मुलाच्या ताटात नकळत पडतात.
तसेच ताट ठेवून तो मुलगा उठतो अन घराबाहेर पडतो...
तोच मुलगा बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जीवाचे रान करतो अन "आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था उभारतो".अन त्या मुलाचे नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील.
#वि. स. खांडेकर म्हणाले होते की "स्त्री चे अश्रू हे अणुबॉम्ब पेक्षा भयानक अन विध्वसंक असतात".
पण कर्मवीर आण्णाच्या पत्नीच्या आसवाने तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली.प्रसंगी या माऊलीने गळ्यातील डोरलं मोडलं.पोरांना जेवू घातलं पण शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. ती आज अखेर...
सध्याच्या सोकोल्ड युगात 'क' कमळाचा नसून "कर्मवीर" भाऊराव पाटील यांचा शिकवण्याची गरज आहे.
कर्मवीर हे दलित बांधवांचे,गरीब गरजू कुटुंबाचे,अनाथांचे पांडुरंग,ज्यांनी ज्ञानामृता चा घडा भरून या सर्वांच्या पक्षांत भरभरून ओतला.सर्वांना तृप्त अन भयमुक्त केले.ज्यांना लिहता वाचता येत नव्हतं,ज्यांना शाळेत सुद्धा प्रवेश मिळत नव्हता अशांना मानाने जगायला शिकवणारे अण्णा कर्मवीर म्हणून ओळखले जातात.
हिंदू,मुस्लिम, ब्राम्हण, शूद्र या जातीपातीवर एकही वाईट शब्द न उच्चारता,हिंदू धर्मातील अठरापगड जातींना सोबत घेऊन ,कोणाचा द्वेष न करता,इंग्रजांच्या चातुगिरी ला न भीक घालता शून्यातून विश्व उभा केले.
अंधारातून प्रकाशाकडे वाट निर्माण केली.18 व्या अन 19 व्या शतकात छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर दुसरा जन्म घेतलेला हा कर्मवीर हा एकमेव चं होता.
"कर्मवीर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग होते." - पंजाबराव देशमुख
अमोल भोसले.
अप्रतिम
उत्तर द्याहटवा🙏😍🙏
उत्तर द्याहटवाअसा हा कर्मवीर. "योद्धा "
उत्तर द्याहटवाज्यांनी शिक्षणाचां प्रसार त तळा गळ्यातल्या पर्यंत पोहचवण्यासाठी जीवाचे रान केले...🙏🙏🙏🙏 छान लिहलय भावड्या!!!👍
🙏😍😍🤞🤞🙏
हटवाKarmveer...🙏🙏
उत्तर द्याहटवासमाज सुधारणा करण्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे हे ओळखून त्या दिशेने त्यांनी अपार कष्ट घेतले. तू कमीतकमी शब्दात ते आणले आहेस
उत्तर द्याहटवाTy sr🙏♥️
उत्तर द्याहटवाखूपच छान सर आपल्यामुळे आम्हास कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य समजले. धन्यवाद !
उत्तर द्याहटवा