पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"केरळा स्टोरी " : सत्य कि अजेंडा....?

इमेज
दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपल्या देशातील सर्वांत साक्षर मानल्या जाणाऱ्या राज्यातील भयानक वास्तव अत्यंत चतुराईने पडद्यावर मांडली आहे. कशा पद्धतीने सर्व धर्माच्या निर्दोष महिलांना कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तर कधी धमकीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं, याचं चित्रण मनाला अस्वस्थ करणारं ठरतं. ‘द केरळ स्टोरी’सारखा विषय मोठ्या पडद्यावर मांडणं सहजसोपं नाही. मात्र सुदीप्तो यांनी दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. यातील संवादसुद्धा अत्यंत विचारपूर्वक लिहिण्यात आले आहेत.  ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ने निर्माण केलेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन राजकीय तसेच धार्मिक मतभेद निर्माण करणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात एक तेढ निर्माण करणारा चित्रपट आहे. एक अनुभव हा चित्रपट सामान्य लोकांच्या मनावर किती खोलवर परिणाम करतो हे मला सांगून गेला. तसं पाहायला गेलं तर ही फार किरकोळ गोष्ट आहे, पण ‘द केरला स्टोरी’मुळे याच छोट्याछोट्या गोष्टींतून लोकांच्या मनामधील धार्मिक द्वेष जाणवायला हा एक अनुभवच माझ्यासाठी पुरेसा आहे. धर्म, जात वगैरे सगळं