साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....
महाराष्ट्र ही संताची, राष्ट्रनायकांची, क्रांतिवीरांची, सामाजिक झटणा-ऱ्या सुधारकांची आणि मानवतेच्या मूल्यांची स्थापना करण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची, विचारवंताची भूमी राहिलेली आहे. याच भूमीमध्ये प्रागतिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली, विकसित झाली, प्रसरण पावली आणि अधोगामी विचारधाराही निपजली. प्रत्येक वेळी प्रागतिक विचारधारेची सरशीच झाली असे नव्हे; परंतु महाराष्ट्रातील जनतेने प्रागतिक विचारांना बळ देण्याचे काम केले. इतिहासाच्या पानापानांवर गर्दी करून राहिलेल्या घटनांमध्ये, सुवर्णाक्षरांनी नोंदवाव्यात अशा काही व्यक्ती व घटना आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचे एकजीव असे समाजमन घडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला.आणि या आधुनिक महाराष्ट्राला सुंदर राजमहाल ज्या अनेक क्रांतिकारक कार्यातून झाला; त्या अनेक शिल्पकारांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे, कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज होत. छत्रपती राजर्षी शाहूंनी ज्या काही समाजपरिवर्तनाच्या चळवळी बांधल्या, विकसित केल्या; किंबहुना त्यांना आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक बळ दिले, ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. राजर्षी शाहूंची