पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैत्री....

इमेज
आज मैत्री दिन त्यानिमित्ताने थोडंसं....      आज या विषयावर लिहताना मला  मित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर मिळते ते म्हणतात, "ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच."         तुमच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी म्हणून येणाऱ्या व्यक्ती मुळे तुम्ही घडू पण शकतात आणि बिघडू पण शकतात ..तुमच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी म्हणून येणारी व्यक्ती का ? कशी ? व कोणत्या करणासत्व आली हे मित्र या संकल्पनेला समजण्यासाठी फार महत्वाचे ठरते .. फक्त काही भेटी गाठी झाल्या व त्या भेटीत ओळखी झाल्या ... की आपण त्या ओळखीना लगेच मैत्री हे नाव देतो ... पण सरसकट कोणत्याही व्यक्ती आपल्या जीवनात येणं आणि आपण लगेच