मैत्री....
आज मैत्री दिन त्यानिमित्ताने थोडंसं....
आज या विषयावर लिहताना मला
मित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर मिळते ते म्हणतात,
"ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच."
तुमच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी म्हणून येणाऱ्या व्यक्ती मुळे तुम्ही घडू पण शकतात आणि बिघडू पण शकतात ..तुमच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी म्हणून येणारी व्यक्ती का ? कशी ? व कोणत्या करणासत्व आली हे मित्र या संकल्पनेला समजण्यासाठी फार महत्वाचे ठरते .. फक्त काही भेटी गाठी झाल्या व त्या भेटीत ओळखी झाल्या ... की आपण त्या ओळखीना लगेच मैत्री हे नाव देतो ... पण सरसकट कोणत्याही व्यक्ती आपल्या जीवनात येणं आणि आपण लगेच त्यांना मैत्रीचं नाव देणं हे कित पत योग्य हे कालांतराने कळते ... कारण खरी मैत्री चा अर्थ फार वेगळा आहे तो खूप ठराविक लोकांना कळतो व म्हणून ज्यांना मैत्री कळली ते हे नातं जिवा पलीकडे जपतात ... कधी आपल्या सारख्या सम विचारांचे लोक आपल्या जीवनात येतात आणि मैत्री होते ...तर कधी व्यवहार व कामाच्या निमित्त भेट होते त्यातून एक चांगले संबंध निर्माण झाले की , आपण त्याला ही मैत्री म्हणतो ..
कधी आपल्याला आधार देणाऱ्या व्यक्तीला आपण मैत्री चे नाव देतो ..तर कधी गरजा पूर्ण करणाऱ्या मदतगाराला पण आपण मैत्रीचं म्हणतो ... मग खरी मैत्री कोणती ? असा प्रश्न जर पडत असेल तर स्वतःला विचारा की ज्या व्यक्तीशी बोलतांना तुम्ही मनमोकळे पणाने बोलतात ,कोणतंही दडपण तुमच्या मनावर नसते ,त्याला वा तिला काय वाटेल अशी शंका निर्माण होत नसेल ..रोज नाही भेटलात तरी जेव्हा भेटतात तेव्हा तक्रारी ऐवजी हक्काने कुठं गेली होती दिसली नाही ती ..इतकं मनमोकळे पणाने विचारता आलं पाहिजे ..मैत्रीत त्यांच्या यशाचं त्यांच्या पेक्षा ही आपल्याला व आपल्या यशान त्याने आनंदी होऊन नाचाव ..आपल्या दुःखात जाऊ दे सोडून दे करत धीर देणार नात हवं .. थोडक्यात काय तर मैत्री हे नातं पाण्यासारख निर्मळ आणि स्वच्छ हवं त्यात कोणताही स्वार्थ किंवा अपेक्षा नसाव्यात व्यवहार तर मुळीच नसावा .. कामापूर्ती काही लोक तुमच्याशी संबंध जोडतात व त्याला मैत्री असं नाव देतात .... ती खरी मैत्री नाही , कारण ज्या दिवशी तुमची गरज संपते त्या दिवशी यांची मैत्री संपते .. मैत्री ही संकटातून वाचवणारी हवी संकटात टाकणारी नाही ..मैत्री ही योग्य दिशा दाखवणारी हवी ..मैत्री ही आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व घडवणारी हवी .. या जगात नकली मैत्री करणारे खूप भेटतील ,जे लोक फक्त आपल्या समोर आपली वाह वाह करतात ..गोड बोलतात पण त्यांना मनातून आपल्या बद्दल राग असतो ..असे लोक आपल्या बद्दल इतरांशी बोलतात ..याला मैत्री म्हणत नाही .. चांगली मैत्रीण वा मित्र तोच असतो जो तुम्ही चुकत असतांना तुम्हाला तो तुम्ही चुकू नये म्हणून मार्गदर्शन करतो ..एक चांगली मैत्रीण किंवा मित्र तोच असतो जो आपल्यासाठी कधी गुरू म्हणून उभा असतो ..तर कधी भाऊ बहीण बनून हक्काने भांडत असतो ... तर कधी आई वडिलांसारखी काळजी वाहत असतो .. मैत्री या एका नात्यात एव्हडी नाती सामावली आहे .म्हणूनच या नात्याची किंमत जास्त आहे पण जी त्याला कळते ज्याला माहीत आहे .आणि म्हणून हे अनमोल नातं टिकवायच असेल तर ते दोन्ही बाजूनी असणं गरजेचं आहे ...मैत्री करण्या मागच्या भावना व उद्देश समान असणं गरजेचं आहे .. आपण म्हणतो आपले ढीगभर मित्र मैत्रिणी आहेत आपल्याला ..पण खरा मित्र किंवा मैत्रीण जर शोधालं तर लक्षात येईल अरे ही तर फक्त नावांची यादी आहे ..मानत घर करणारे मोजकेच मित्र आहेत ... तेव्हा मैत्री कशी असावी तर आपल्या मनात घर करणारी असावी ... आत्ता आपण वरील सांगितल्या प्रमाणे मैत्री या नात्यात बसणारे किती लोक आहे याची यादी केली की तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल ..
शेवटी एकच सांगावस वाटतं ..
मैत्री कशी असावी ....
पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी
दुधाहूनही स्निग्ध ; जिभेला मऊसूत करणारी
दह्याहूनही कवडी ; जिभेवर टिकून राहणारी
तुपाहूनही रवाळ ; जिभेवर रेंगाळत राहणारी
श्रीखंडाहूनही निघोट ; जिभेवर मुरत जाणारी
चिवड्याहूनही कुरकुरीत ; जिभेला सोकवायला लावणारी
चकलीहूनही खुसखुशीत ; जिभेला अतृप्त करणारी
पिठीसाखरेहूनही गोड ; जिभेवर विरघळत जाणारी
अन मधाहूनही घट्ट ; जिभभर पसरत जाणारी
मैत्री अशी हवी !
अमोल शिवाजी भोसले.
2 ऑगस्ट 2020
पुन्हा इकदा भाषेचा ( शब्दांचा ) खजिना आमच्या पर्यन्त पोहचल्या बदल आभार...तुपाहूनही रवाळ,
उत्तर द्याहटवाश्रीखंडाहूनही निघोट यामधील रवाळ,निघोट हे नवीन शब्द आम्हाला कळाले..
तुमचा आयुष्यातील मैत्रीचा प्रवास, आणि या प्रवासातील सुखद आणि कटू अनुभव याची मोजक्या शब्दात मांडणी केली आहे....
यावर बनवाबनवी चित्रपटातील गाणे आठवले
"थोडे द्यावे थोडे घ्यावे, एक मेका प्रेम द्यावे
चाकावाचून गाडी नाही, ताकावाचून लोणी
अन मित्रावाचून जगात कैसा जगेल माणूस कोणी"
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा……🙏🙏🙏
Nice keep it up...
उत्तर द्याहटवाKharach tuzyakade shabdanch Bandar ahe...
हटवाKhup chan...
उत्तर द्याहटवाअमोल तुझे लेख अनमोल आहेत 💐
उत्तर द्याहटवाTy सर.
हटवातुमचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर काहीच कमी पडणार नाही.
Bhari ahe lekh
उत्तर द्याहटवाTy साहेब केवळ तुमच्यामुळे च...
हटवाKhup bhari sir
उत्तर द्याहटवाKhup Sundar Amol.. keep it up
उत्तर द्याहटवामाझा हा पहिलाच blog होता जो मी वाचला, त्यामुळे मी खर सांगेन मला खुपच आवडला आणि आजपासून तूमचे सर्व blog मी आवडीने वेळ काढून वाचेन अमोल दादा असेच छान blog बनवत रहा.
उत्तर द्याहटवाखुप छान... मैत्री असावी तर शंभूराजे आणि कवी कलश यांच्या सारखी... ईर्ष्या, स्वार्थ, मत्सर, कपट-कारस्थान यांना कोठेही स्थान नव्हते. होते फक्त प्रेम, आपुलकी, निस्वार्थ, स्वातंत्र्य, त्याग, आणि शेवटपर्यंत साथ...
उत्तर द्याहटवाआज जर पाहायला गेलं तर मैत्री कमी नी reciprocation जास्त आहे. पुस्तकांसारखे मित्र दुसरा नाही.
खूप मार्मिक बोललात सर....लई भारी..💛👬
उत्तर द्याहटवाखतरनाक 👌
उत्तर द्याहटवा