स्टेटस....


स्टेटस....
              
               तसा हा सोशल मीडिया मुळे गेल्या 15 वर्षांपासून चर्चित असलेला इंग्लिश शब्द.पण तो जगभरातील अब्जाधीश माणसापासून ते गरीबातल्या गरिबांपर्यंत चिकटला.त्याचा मराठी अर्थ शोधला तर त्याचे बरेच अर्थ निघालेत.स्थिती, दर्जा, मनुष्याचे समाजातील कायदेशीर,नैतिक स्थान,असे अर्थ निघाले.पण ह्या अर्थाचा माणूस हा सहजासहजी घडत नसतो.
असो...पण आजच्या 21 व्या विज्ञान युगात हा
आज-काल सहज वापरला जाणारा शब्द म्हणजे स्टेटस. WhatsApp Facebook Status हे 30 सेकंदाचेच पण ते ठेवताना प्रत्येकजण 30 मिनिटे नक्कीच विचार करीत असेल. म्हणजे आपण कसे आहोत? हे आपल्या Contact List मधील सर्वांना दाखवण्याची ही धडपड.
त्याचबरोबर आपले समाजात एक Status असते, ते जपण्यासाठी आपण किती धडपड करतो. आपण सर्वांचा आदर्श असावे, समाजामध्ये मानाचे एक स्थान असावे असे सर्वांना वाटत असते. जो तो आपल्यापरीने प्रयत्न करीत असतोच. काहीजण आपले Status हे पैशावर मोजत असतात, काहीजण समाजातील केलेल्या कार्यावर मोजतात. यात मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे. पण मला वाटते पैसा इज्जत देतो पण आणि काढतो पण. आपण चांगले कार्य केले तर चिरंतन राहू शकते. आपण कुणासोबत आहोत यावरही आपली किंमत ठरवली जाऊ शकते. चणे ज्यावेळेस गुळासोबत असतात तेव्हा त्याला "प्रसाद" म्हणतात आणि दारुसोबत असतात तेव्हा त्याला "चकणा" म्हणतात. आहारात 'सत्व', वागण्यात 'तत्व', आणि बोलण्यात 'ममत्व' असेल तरच, जीवनाला 'महत्व' येते. 
                  शेवटी काय Status कोणतेही असो, जीवनाचे एक अंग आहे. आणि त्यासाठी साचेबद्द राहिले पाहिजे. जीवनाच्या असंख्य पायऱ्या चढा, पण पायरी सोडून वागू नका. हेच आजकालचे खरे Status आहे.

अमोल शिवाजी भोसले.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"