मनाचा तळ......

                  
             मनाचा तळ......

       "एकूण मनाचा खेळ तसा खुप सुंदर असतो. कोणत्याही अवयवाच्या रुपात तो कधी सापडलाच नाही. देवाने कदाचित निर्माण केला असता तर सगळ्यांना प्राप्त झाला असता.पण मन खूपच सुंदर असतं.माणूस सारं सारं आपल्या मनांत भरत असतो. सुख दुःख, तृष्णा,संपती, चांगलं ,वाईट,वेदना आणि खंत सुद्धा.त्यामुळेच जगातलं सर्वसंपन्न,
सर्वव्यापी, सर्वशक्तिमान  असं ठिकाण म्हणजे मन.म्हणूनच आपण नेहमी म्हणत असतो की ,एकदा का माझ्या मनात आलं ना..की मी ती गोष्ट सोडतच नाही. मनांत येणं याचा असाही अर्थ होऊ शकतो की प्रचंड ऊर्जा प्राप्त करणं...प्रचंड निर्धार करणं आणि कृतीच्या पातळीवर जाणं."

                     
                          अमोल भोसले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"