हॅलो प्रीतम.....

           Hello प्रीतम.....


           ती शून्यमधली यात्रा,
            वाऱ्यातील एक विराणी,
             गगनात विसर्जित होता,
              डोळ्यात कशाला पाणी....
 
प्रिय प्रीतम,
                  काही काही प्रसंग बोलायला जेवढे अवघड असतात तेव्हढेच सांगायला सुद्धा जड जातात. आजच्या तारखेला बरोबर एका वर्षांपूर्वी तू आम्हांला सोडून गेलास.तुझं जाणं हे अगदी मनाला चटका लावणार, अन माझ्यासाठी धक्कादायक होतं.मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर निघून जाशील.पण काळाचे अन नियतीचे दरवाजे कधी कुणासाठी एकदम उघडतील हे ज्याच्या त्याच्या नशिबाला माहीती. तो दरवाजा कुणाच्या आयुष्यात सोनेरी सकाळ घेऊन येतो तर कुणाच्या आयुष्यात कुट्ट काळरात्र....पण तुझ्या बाबतीत दैवाचे फासे उलटे फिरले अन माझ्या लाडक्या मित्राला आमच्यापासून हिरावून घेतलं.

 
तशी तुझी माझी मैत्री ही झाली ती तुझ्या कॉलेज मध्ये ऑल युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट compition मध्ये. त्यावेळी त्या प्रोजेक्ट compition मध्ये आमचा 1ला अन 2रा क्रमांक आला होता.त्यावेळी तुझा जो काही compition मध्ये मी पाहिलेला सहभाग होता तो खूप मस्त होता.तू त्यावेळी हरप्रकारे आमची खूप मदत केलीस. त्यापासून तुझी माझी मैत्री ही कायमस्वरूपी झाली.त्याला तुझा तुझ्याकडे असणारा चांगुलपणाच कारणीभूत होता.तू एकदम दिलदार माणूस होतास  प्रित्या.....
काही वर्षांनी पुन्हा आपण भेटलो ते पुण्यात.
पुण्यात स्पर्धा परीक्षेसाठी गेल्यावर तिथे सुद्धा एकत्र राहिलो -भेटलो.एकच अभ्यासिका,एकच मेस अन एकच क्लास..अस आपण नेहमी बरोबर राहिलो.तू कधीच मला अंतर दिल नाहीस...भावासारख माझ्यावर प्रेम केलंस अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.या निमित्ताने मला तुझ्या खूप साऱ्या आठवणी आठवत राहिल्या आहेत .किती सांगू अन काय काय सांगू....
     तू दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्या लक्षात आहे.तुझं बोलणं ,वागणं,चालणं सगळं कसं दिलखुलास असायच.तू नेहमी केसांची हेअरस्टाईल दर 3 महिन्याला नवीन करायचास.तुला ते एकदम फिट व्ह्यायचं. तुझ्या एका हेअर sytle वरून तर तुझं नाव आम्ही किम जोंग ठेवलं होतं.त्यावरून सुद्धा आम्ही तुला खूप चिडवायचो.पण तू कधी त्याचा त्रास करून घेतला नाहीस.अगदी येणारी प्रत्येक अडचण तू खिळाडूंवृत्तीने घेतलीस.
     मला आठवतय आपण खूप सारी चांगली व्याख्याणं एकत्र ऐकली...पाहिली.
तुझ्या बरोबर तर कित्येकदा सिनेमा पाहायला गेलो....आपण पुण्यातील चांगली नाटकं कधी पाहायला चुकवली नाहीत.त्यावेळी तुझी सोबत नेहमी मला भक्कम वाटायची.तुझा अभ्यास पण खूप खोलात असायचा...तुला गणिताचा कुठलाही प्रश्न कधीच अडला नाही...जेव्हा आम्हाला तो सुटायचा नाही तेव्हा तूला तो बरोबर सुटायचा.इतिहास विषय तर तुझ्या खूप आवडीचा होता..सगळे संदर्भ ग्रंथ तू वाचून काढले होतेस...तुझ्या घरीसुद्धा पुस्तकाचा साठा भरपूर असायचा.डॉ.आंबेडकर, महात्मा फुले,शिवाजी महाराज अन शाहू महाराज यांच्याविषयी चा सगळा इतिहास तुला तोंड पाठ होता.त्याबद्दल बोलताना तुझ्या बोलण्यातून जाणवायचे.तू खरंच ग्रेट होतास यार....
  कोरोना काळात तर आपण नेहमी फोनवरून बोलत असायचो.तू विटा येथील तुझ्या घरून नेहेमी मला सकाळ संध्याकाळ ph कारायचास.त्या काळात सुरुवातिला मला बरे नव्हते तेव्हा तू सारखा ph करून माझी चौकशी कारायचास.हे खा ते खाऊ नकोस अस सारखं सांगायचास.ही नवीन पुस्तक वाच..ही webseries बग तो picture बग..अस सांगून त्या दिवसात मला नेहमी motivate ठेवलं होतंस.
   नंतरच्या काळात कोरोना लाट ओसरल्यावर परत पुन्हा आपण पुण्यात भेटलो...एकत्र राहिलो...एकत्र अभ्यासिका...एकत्र मेस..आणि एकत्र अभ्यास सुद्धा केला...भरपूर वेळ तू मी अन राम आपण रात्री disscussion करत बसायचो...दररोज एक एक विषय हातावेगला केला.आपण icecream खाण्याची सुध्दा स्पर्धा लावली होती..अन प्रत्येक वेळी तूच जिंकायचास..मला अजून तो दिवस आठवतोय ज्या दिवशी आपलं शेवटच dissussion झालं अन तू मला अन राम ला भरपूर ice-cream ची पार्टी दिली होतीस.तो दिवस होता 18 मार्च 2021 चा.त्यावेळी आपण भरपूर हसलो...त्यावेळी तू जरासुद्धा आम्हाला जाणवू दिल नाहीस की तुला त्रास होतोय तो.
 नंतर मी गावी आलो अन तू exam साठी तिथेच थांबलास. जाताना तु मला स्वारगेटला सकाळी 5 वाजता सोडायला आला होतास.नंतर ph वर आपण बोलत राहिलो.काही दिवसांनी तुला कोरोना ची लागण झाली अन तू त्यात अडकत गेलास... त्यावेळी तू ph करून मला सुद्धा टेस्ट करायला सांगितले होतंस.पण मला typhoid च निदान झालं.तू मिरजेला अन मी कोल्हापूर ला ऍडमिट झालो.तरीसुद्धा मी तुझ्याशी कायम ph वरून तुला आधार देत राहिलो.घाबरू नकोस अस वारंवार सांगत राहिलो..सुरुवातीला तुझी त्यबेत चांगली झाली.अन काही दिवसानंतर परत तुला त्रास झाला.हे तूच मला ph करून कधी व्हाट्सउप वर msg करून सांगत होतास...मी सुद्धा तुला तू लकवर बरा होणार अस म्हणून तुला motivate करत राहिलो .अगदी 4 एप्रिल च्या दुपार पर्यंत.तो whatsup vidio केलेला कॉल हा शेवटचा ठरेल असं मला जन्मात सुद्धा वाटलं नव्हतं.दुसऱ्या दिवशी मला येत असलेले ph तू गेलास हे सांगायला आले.तरी माझा त्यावर विश्वास बसेना.नंतर पेपर मध्ये आलेली माहिती अन तुझ्या जवळच्यानी दिलेली माहिती खरी ठरली अन माझा लाडका मित्र देवाघरी गेला.
 तुला जाऊन आज 1 वर्ष झालंय दोस्ता...पण एक दिवस असा जात नाही की तुझी आठवण मला येत नाही.कधीतरी तुझा ph येईल याचीच आस लागून राहिली आहे बग...तू गेल्यापासून मी आता एकटा पडलोय प्रित्या..नवीन मित्र जोडणं मी आता सोडून दिलंय...कधी कोणी जीव लावलेला अर्ध्या वाटेत सोडून जाईल सांगता येत नाही...त्यामुळे मी आता मोजक्याच मित्रांन बरोबर असतो जे तुझे नि माझे कॉमन मित्र आहेत...
शेवटी देवाकडे एकच मागणं आहे की जन्मोजन्मी तुझ्यासारखा सखा,यार,दोस्त मला मिळू दे...
   प्रित्या तू जिथे कुठे असशील तिथे मस्त राहा
 अगदी तुझ्या स्वभावासारखा...
 Miss u Dear....😢😢😢😭😭😭

तुझाच  
           अमोल......
🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🙏

टिप्पण्या

  1. मस्त लेख सर

    खूप दुःखद आणि हृदयस्पर्शी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"गड आला पण सिंह गेला": डॉ. नरेंद्र दाभोलकर

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

चला झाड होऊया........