सौंदर्य....

जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य सर्वत्र आहे तेव्हा आपल्याला असे म्हणायचे नसते की कुरुपता हा शब्द भाषेतून नाहीसा केला पाहिजे. असे म्हणणे म्हणजे असत्य असे काही नसते असे म्हणण्याइतकेच मूर्खपणा चे ठरेल.असत्य हे खात्रीने अस्तित्वात आहेच,पण ते विश्वाच्याप्रणालीत असत नाही तर ते आपल्या आकलनाच्या क्षमतेत त्यातील नकारात्मक भाग म्हणून असते.याचं पध्दतीने आपल्याला झालेल्या सत्याच्या अर्धवट साक्षात्कारामुळें आपल्या जीवनातून व आपल्या कलातून सौन्दर्याची विकृत अभिव्यक्ती होते आणि त्यामुळे आपणास कुरुपता येते.काही प्रमाणात आपण जे आपल्यात आहे, आणि जे इतर सर्वात आहे अश्या सत्याच्या नियमांच्या विरोधात आपले जीवन मार्गस्थ करू शकतो आणि त्याचप्रमाणे सार्वत्रिक असलेल्या सुसंवादाच्या शाश्वत नियमाला उलटे फिरवत कुरुपता निर्माण करू शकतो.

अमोल नंदा शिवाजी भोसले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"