पोस्ट्स

#हातरस अत्याचाराचा निषेध

स्वर्गीय मनीषा वाल्मिकी हिला अभिवादन करून.....   स्त्री सन्मानासाठी रामायण ,महाभारताचा दाखला देणार्यांनी हे लक्षात ठेवावं की,त्याच महाभारतात एका स्त्री ला जुगारावर लावणारे..तिच्या वस्त्रहरनाची मानवतेला काळिमा फासणारी घटना पाहणारे..खरंतर तिच्यासाठी लढले की सत्तेसाठी? आणि रामायणाचे यापेक्षा काही वेगळे नाही हो..यात सीतेला न्याय मिळाला म्हणता येईल कदाचित कारण नंतर तिला सुद्धा मरण यातना सहन कराव्या लागल्या..पण,सीतेसाठी लंकेवर चालून गेलेल्यांनी अगोदर रावणाच्या बहिनीचे नाक कापले होते..ती स्त्री नव्हती का?..सीतेचे अपहरण करणाऱ्याला रामा न ठार केलं..सीतेला न्याय मिळाला..पण रावणाच्या बहिणीला अजून न्याय मिळाला का ?..नाही.. बहुदा ती दलित असावी...😢 #हातरस अत्याचार निषेध अमोल भोसले

"गड आला पण सिंह गेला": डॉ. नरेंद्र दाभोलकर

इमेज
            या देशाला महाराष्ट्राने फार अनमोल रत्न दिलीत.त्या अनमोल रत्नानीच या देशाला ,या महाराष्ट्राला आकार ,उकार दिला.त्या अनेक रत्नापैकी एक कोहिनूर होता तो म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर . भाषणाची सुरवात कार्ल मार्क्स च्या "धर्म ही अफूची गोळी आहे".असे करून श्रध्दा आणि अंधश्रद्धा यांचा सविस्तर पाढा सादर करत.            अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला. अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी डॉ. नरेंद्र दाभोलकर सर्वात धाकटे अपत्यं.डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्‍यातील  न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. पूढे सांगली येथील “विलिंग्डन महाविद्यालया”तून त्यांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यावर डॉ. दाभोलकरांनी सातार

रक्षाबंधन...

इमेज
रक्षाबंधन...... रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे. स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.          बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री

"34 वर्षांनी जन्माला आलेल नवं कोर शैक्षणिक धोरण"

इमेज
"३४ वर्षांनी जन्माला आलेल नवं कोर शैक्षणिक धोरण" महाराष्ट्राचे आद्य युगप्रवर्तक,समाजसुधारक,अन सर्वार्थाने थोर असे स्व.गोपाळ गणेश आगरकर राष्ट्रीय शिक्षणाची व्याख्या करताना ते म्हणतात, ''प्रत्येक स्वतंत्र देशातील सरकार आपल्या प्रजेला जे शिक्षण देते किंवा देऊ इच्छिते ते राष्ट्रीयच असते. देशातील तरुण पिढी देशाचे राजकीय, औद्योगिक आणि सामाजिक वैभव राखण्यात किंवा वाढवण्यात समर्थ होईल अशा प्रकारे त्यास शिक्षण देणे हे देशातील विद्या खात्याचे कर्तव्य आहे ". आणि त्यास राष्ट्रीय शिक्षण असे नव्या शैक्षणिक धोरणाला बुधवारी मंजुरी देण्यात आली. अभ्यासक्रमाचे स्वरूप रोजगारक्षम आणि विशेष कौशल्य विकसित करण्याच्या दिशेने पावले टाकण्याचा यात प्रयत्न होताना दिसतो आहे. या धोरणाची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. ती आता पूर्ण झाली असून लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. शिक्षणासारख्या मूलभूत आणि जगण्याचा मंत्र शिकवणाऱ्या आणि आत्मविश्‍वासाचे बळ देणाऱ्या क्षेत्राच्या बदलाची पहाट उजाडायला तब्बल 34 वर्षे लागली. हा काळ फार मोठा आहे. मात्र, कधीही काहीही न करण्यापेक्षा काहीतरी घडले(राफे