पोस्ट्स

"संस्कार चारित्र्य घडवतात..."

       आपली प्रत्येक कृती ही तलावाच्या पृष्ठभागावर आंदोलीत होणाऱ्या तरांगसारखी असते. आपल्या प्रत्येक क्रियेने चित्तसरोवरावर जणू एक तरंग येऊन जात असतो. हे तरंग विरून गेल्यावर काय उरते? संस्कार...! असे अनेक संस्कार मनावर पडले म्हणजे ते एक होतात आणि ती माणसाची " सवय  " बनतात. ' सवय हा माणसाचा दुसरा स्वभावच होय '( Habit is second nature of Human) असे म्हणण्याचा प्रघात आहे. केवळ दुसराच नव्हे, तर सवय हा माणसाचा प्रधान स्वभाव आहे. नव्हे,तर तो पुरा स्वभाव आहे असं म्हणता येईल. आपला आजचा पुरा स्वभाव हा आपल्या सवयी चे फळ आहे. ही वस्तुतिथी तुम्हां आम्हाला केवढा तरी दिलासा देते. कारण आमचा स्वभाव जर केवळ आमच्याच सवयीनी बनलेला असेल, तर आपण तो केव्हाही बदलून टाकू शकतो ; तसे करणे आपल्याचं हाती असते. आमच्या मनामध्ये हे जे तरंग वा लाटा उठत असतात, त्यांचा प्रत्येकाचा परिणाम म्हणून एक एक चिन्ह मागे राहून जात असते. मागे राहिलेल्या या चिन्हालाच " संस्कार " म्हणतात. आपले चारित्र्य म्हणजे या सगळ्या चिंन्हाची, म्हणजे संस्काराची गोळाबेरीज होय. जो विशिष्ट प्रवाह वरचढ ठरतो तसा एकूण माणू

कर्मवीर भाऊराव......

इमेज
                               घरी पाहुणे आलेले असतात.जेवण चालू असते. जेवताना पाहुणे विचारतात मुलगा काय करतो. वडील म्हणतात, "काही नाही खातो पितो गावभर फिरतो ". हे सर्व ऐकत असते जेवण वाढणारी मुलाची बायको.अन वाढताना तिच्या डोळ्यातून अश्रूची धार लागते... त्यातील दोन अश्रू त्या मुलाच्या ताटात नकळत पडतात. तसेच ताट ठेवून तो मुलगा उठतो अन घराबाहेर पडतो... तोच मुलगा बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जीवाचे रान करतो अन "आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था उभारतो".अन त्या मुलाचे नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. #वि. स. खांडेकर म्हणाले होते की "स्त्री चे अश्रू हे  अणुबॉम्ब पेक्षा भयानक अन विध्वसंक असतात". पण कर्मवीर आण्णाच्या पत्नीच्या आसवाने तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली.प्रसंगी या माऊलीने गळ्यातील डोरलं मोडलं.पोरांना जेवू घातलं पण शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. ती आज अखेर...  सध्याच्या सोकोल्ड युगात 'क' कमळाचा नसून "कर्मवीर" भाऊराव पाटील यांचा शिकवण्याची गरज आहे. कर्मवीर हे दलित बांधवांचे,गरीब गरजू कुटुंबाचे,अनाथांचे पा

किंमत...

             किंमत.....                                 खरंतर हा तीन अक्षरी शब्द माणसाला प्रत्येक गोष्टीत जाणीव करून देत असते यासाठी एक उदाहरण पाहू.....     "एक श्रीमंत माणूस एकदा नदी काठावरील एका शंकराच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळात शिरणार तेव्हढ्यात त्यांच्या मनांत आले की समोर नदीचे पात्र आहे त्यात स्नान करून ओलेत्यानी शंकराची पूजा करावी. म्हणून ते चालत नदीकाठाशी आले. काठावर हातपाय धूत असताना त्यांचा तोल गेला आणि ते नदीपात्रात पडले. त्यांना पोहता येत नव्हते. ते ओरडायला लागले. काठावर अनेक लोक होते पण त्यांना वाचविण्यासाठी कोणी पुढे येईना. शेवटी काठावर संध्या करीत असलेल्या एका साधूने हा आरडाओरडा ऐकला. तो साधू धावत त्या काठाजवळ आला. त्याने त्या माणसाला बुडताना पाहिले आणि क्षणार्धात पाण्यात उडी मारली. बुडणार्‍या त्याला धरून काठावर ओढत आणले. आणि त्याचा जीव वाचविला. थोडावेळाने तो श्रीमंत माणूस शुद्धीवर आला. ह्या साधूने आपला जीव वाचविला हे समजताच त्याने खिशात हात घालून नोटांची गठ्ठी बाहेर काढली आणि त्यातील एक रुपयाची नोट साधूच्या हातावर बक्षीस म्हणून ठेवली. हे पाहून आसपासचे लोक

🇮🇳 भारत @75 वर्षे....🇮🇳

इमेज
              भारत @75 वर्षे .....    "हम अपनी जान के दुष्मन को  अपनी जान  कहते है... मोहब्बत  की  इसी मिट्टटी को हिंदुस्तान  कहते   है  |                                भारतीय घटनेच्या  प्रस्तावनेतील  सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही हे  3  शब्द वाचकांच्या  कायम  लक्षात  राहतील.  ही आधुनिक प्रजासत्ताकाची गुणवैशिष्ट्ये  आहेत. अशा  प्रजासत्ताकाची स्थापना  करण्यासाठी  आपण लढा दिला  आणि  आजच्या तारखेला  बरोबर  75 वर्षे  मागे  म्हणजे    15 ऑगस्ट  1947  रोजी  भारताला  स्वातंत्र्य  मिळाले.                           शतकानुशतके  पारतंत्र्यात असणाऱ्या या देशाचे  बहुतेक भाग सार्वभौम  होते..राज्य  सार्वभौम  होते...पण जनता  सार्वभौम  नव्हती .पण आज  आपल्या   या 130 कोटी  लोकसंख्येच्या  देशाने  लोकशाही  , सार्वभौमत्व ,आणि  प्रत्येक  अधिकार  आपल्या  गुणसूत्रामध्ये सामावून, मुरवून घेतला आहे. गेल्या 75 वर्षाच्या प्रवासातील   हे आपले सर्वात मोठे यश आहे. राजेरजवाडयांच्या नंतर  आलेल्या  इंग्रजांच्या  अधिपत्याखाली  त्यापूर्वी ची   काही  हजार वर्षे  घालवलेली  गुलामी जनता  पूर्वीच्य

राजकारणातील पाली.....

इमेज
राजकारणातील पाली....       राज्यात गेल्या महिन्यात नुकतच झालेलं बहुपात्री राजकीय नाटकं घडून सत्तांतर झालं.सत्तांतर आणि त्यापाठोपाठ सरकारवरील विश्वासदर्शक ठरवाकरिता झालेल्या विधानसभाअधिवेशनात सर्व काही प्रयोग झाले.त्यात कोण ,कुठे,कधी जातो हा सस्पेन्स होता, मुंबईतुन सुरत व्हाया गुवाहाटी ला पोहचनाऱ्याचं थ्रिल होतं, तरीही निष्ठावान असल्याचा ड्रॅमा होता,वेष बदलून रात्री घेतलेल्या गुप्त भेटीगाठी होत्या,विधिमंडळ च्या भाषणामध्ये राग दिसत होता,द्वेष होता,कोपरखळ्या होत्या,एकमेकांना केलेल्या रानटी गुदगुल्या होत्या ,माझे कसे सगळेच मित्र आहेत हे सांगणे होतं... सर्व काही आलबेल होत.नव्हता फक्त आपल्या सारख्या सामान्य माणूस आणि त्याचे प्रश्न!                विधांनसभेतल्या प्रत्येक निवड केलेल्या कलाकारांची भाषण ऐकतांना महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या कानाला अटॅक आला असेल हे नाकारता येत नाही.ते ऐकून हे  जाणवत होतं की महाराष्ट्राचे 12 कोटी नागरिक आणि त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचा दुरदूरचा ही आता संबंध उरलेला नसून,अवघ राज्य फक्त ह्या  सत्तेच्या सारीपाटा वर लिलावात निघाल

सौंदर्य....

जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य सर्वत्र आहे तेव्हा आपल्याला असे म्हणायचे नसते की कुरुपता हा शब्द भाषेतून नाहीसा केला पाहिजे. असे म्हणणे म्हणजे असत्य असे काही नसते असे म्हणण्याइतकेच मूर्खपणा चे ठरेल.असत्य हे खात्रीने अस्तित्वात आहेच,पण ते विश्वाच्याप्रणालीत असत नाही तर ते आपल्या आकलनाच्या क्षमतेत त्यातील नकारात्मक भाग म्हणून असते.याचं पध्दतीने आपल्याला झालेल्या सत्याच्या अर्धवट साक्षात्कारामुळें आपल्या जीवनातून व आपल्या कलातून सौन्दर्याची विकृत अभिव्यक्ती होते आणि त्यामुळे आपणास कुरुपता येते.काही प्रमाणात आपण जे आपल्यात आहे, आणि जे इतर सर्वात आहे अश्या सत्याच्या नियमांच्या विरोधात आपले जीवन मार्गस्थ करू शकतो आणि त्याचप्रमाणे सार्वत्रिक असलेल्या सुसंवादाच्या शाश्वत नियमाला उलटे फिरवत कुरुपता निर्माण करू शकतो. अमोल नंदा शिवाजी भोसले.

"बुद्ध हसत आहे".....

इमेज
            "बुद्ध हसत आहे"....  "अर्थहीन वादविवादापेक्षा  अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते".                                         - गौतम बुद्ध इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात असलेली गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था ध्वस्त करु पाहणार्‍या साम्राज्यवादी शक्तींना बळकटी प्राप्त होऊ लागली. भौतिक, सामाजिक, राजकीय व वैचारिकदृष्टया संपन्न अशी ही गणराज्यं ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ या उक्तीनुसार आपापसात संघर्ष करत, साम्राज्यवादी एकाधिकारशाही प्रवृत्तीला बळी पडत होती. दुसर्‍या बाजूला तत्कालीन वैदिक धर्म स्वतःच्या निर्माण केलेल्या अभेद्य तटबंद्यांमध्ये अडकून पडला होता. धर्म म्हणजे कर्मकांड आणि समाज म्हणजे न बदलता येणारी जातीय उतरंड असा समज वैदिक धर्ममार्तडांनी दृढमुल केला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात होता. एकूणच राजकीय असो वा धार्मिक अशा दोन्ही स्तरांवर क्रौर्य, व्यभिचार आणि अविवेक यांनी समाजाला ग्रासले असतांना,‘करूणा-शील-प्रज्ञा’ हा महामंत्र देणार्‍या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. कपिलवस्तूच्या या शाक्यवंशीय राजपुत्राने जगातील पहिल्या विश्व