"संस्कार चारित्र्य घडवतात..."
आपली प्रत्येक कृती ही तलावाच्या पृष्ठभागावर आंदोलीत होणाऱ्या तरांगसारखी असते. आपल्या प्रत्येक क्रियेने चित्तसरोवरावर जणू एक तरंग येऊन जात असतो. हे तरंग विरून गेल्यावर काय उरते? संस्कार...! असे अनेक संस्कार मनावर पडले म्हणजे ते एक होतात आणि ती माणसाची " सवय " बनतात. ' सवय हा माणसाचा दुसरा स्वभावच होय '( Habit is second nature of Human) असे म्हणण्याचा प्रघात आहे. केवळ दुसराच नव्हे, तर सवय हा माणसाचा प्रधान स्वभाव आहे. नव्हे,तर तो पुरा स्वभाव आहे असं म्हणता येईल. आपला आजचा पुरा स्वभाव हा आपल्या सवयी चे फळ आहे. ही वस्तुतिथी तुम्हां आम्हाला केवढा तरी दिलासा देते. कारण आमचा स्वभाव जर केवळ आमच्याच सवयीनी बनलेला असेल, तर आपण तो केव्हाही बदलून टाकू शकतो ; तसे करणे आपल्याचं हाती असते. आमच्या मनामध्ये हे जे तरंग वा लाटा उठत असतात, त्यांचा प्रत्येकाचा परिणाम म्हणून एक एक चिन्ह मागे राहून जात असते. मागे राहिलेल्या या चिन्हालाच " संस्कार " म्हणतात. आपले चारित्र्य म्हणजे या सगळ्या चिंन्हाची, म्हणजे संस्काराची गोळाबेरीज होय. जो विशिष्ट प्रवाह वरचढ ठरतो तसा एकूण माणू