"बुद्ध हसत आहे".....
"बुद्ध हसत आहे".... "अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते". - गौतम बुद्ध इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात असलेली गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था ध्वस्त करु पाहणार्या साम्राज्यवादी शक्तींना बळकटी प्राप्त होऊ लागली. भौतिक, सामाजिक, राजकीय व वैचारिकदृष्टया संपन्न अशी ही गणराज्यं ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ या उक्तीनुसार आपापसात संघर्ष करत, साम्राज्यवादी एकाधिकारशाही प्रवृत्तीला बळी पडत होती. दुसर्या बाजूला तत्कालीन वैदिक धर्म स्वतःच्या निर्माण केलेल्या अभेद्य तटबंद्यांमध्ये अडकून पडला होता. धर्म म्हणजे कर्मकांड आणि समाज म्हणजे न बदलता येणारी जातीय उतरंड असा समज वैदिक धर्ममार्तडांनी दृढमुल केला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात होता. एकूणच राजकीय असो वा धार्मिक अशा दोन्ही स्तरांवर क्रौर्य, व्यभिचार आणि अविवेक यांनी समाजाला ग्रासले असतांना,‘करूणा-शील-प्रज्ञा’ हा महामंत्र देणार्या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. कपिलवस्तूच्या या शाक्यवंशीय राजपुत्राने जगातील पहिल्या विश्व