प्रवाह ....
प्रवाह... भूतकाळ,वर्तमान काळ आणि भविष्य काळ अशा तीन टप्यात आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची विभागणी होते. जिथे वर्तमानकाळ अस्तित्वात आहे तिथे भूतकाळ न चुकता तयार होत जातो.वर्तमान आणि भूत यांचं अस्तिव टिकून राहण्यासाठी भविष्यकाळाला यावेच लागते.या तिन्हींच्या चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसाला नेमके कुठे असावे याविषयी खात्रीच येत नाही. पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या एकसलग वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.नद्यांचे हे वाहणे हे आपल्या सगक्यांच्या आयुष्यासारखे आहे.उगमापासून ते समुद्रापर्यंत चाललेला हा प्रवास अविरतपणे सुरू असतो.पण या प्रवासाच्या कोणत्या भागाला जगणे म्हणायचे असा प्रश्न आपल्याला वारंवार पडत राहतो.भूतकाळात रममान होऊन तसे काहीच हाती लागत नाही.भविष्यकाळ हातात नसल्याने त्यात गुंग होऊनही हाती काहीच येत नाही .हे सगळे सिध्दांताच्या पातळीवर कुठूनही प्रत्यक्ष जगताना मात्र नेमकेपणाने वळत नाही. कुठल्याही नदीच्या प्रवाहात जेव्हा जेव्हा आपण उतरतो तेव्हा तेव्हा ती नदी पुर्णतः नवीनच असते.कालचीच नदी