पोस्ट्स

चला झाड होऊया........

इमेज
चला झाड होऊया.....                 तीन आठवड्यापूर्वी गावाकडे STबस ने यायचा योग्य आला.हा रस्ता तसा गेली अनेक वर्षे माझ्या पाहण्यातला अन ओळखीचा आहे.यावेळी जाताना सोबत ओळखीचं दुसरं कोणीच नव्हते.सगळे प्रवाशी माझ्यासारखेच प्रवासाला निघाले होते.प्रत्येक जण आपआपल्या मोबाईल मध्ये व्यस्त होता...क्वचितच गप्पा होत होत्या.मग मी सुद्धा बसमधून   आजूबाजूला पाहत होतो.सकाळी लवकर निघाल्यामुळे वातावरण एकदम ताजतवानं होतं. त्यामुळे निसर्गाच्या दिवसाची सुरुवात पाहणं हाच माझ्यासाठी एक पर्याय उरला.                    प्रत्येक गावाच्या रस्त्यावर शेती, छोटी मोठी हॉटेल्स यांच्या बरोबरीने ठळकपणे जाणवणारी एक बाब म्हणजे वडाची झाडे.गेली अनेक वर्षे मी ही झाडे पाहतोय.आज ती पाहताना मनात सहज एक विचार आला की ही झाडे कोणी लावली असतील? किती वय असेल यांचे? अजून किती वर्षे ही टिकतील? विचार करता करता ध्यानात आले की या झाडांचे वय माझ्या आजी आजोबांच्या वयापेक्षा नक्कीच जास्त असेल.प...

प्रवाह ....

इमेज
              प्रवाह...                      भूतकाळ,वर्तमान काळ आणि  भविष्य काळ अशा तीन टप्यात आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची विभागणी होते. जिथे वर्तमानकाळ अस्तित्वात आहे  तिथे भूतकाळ न चुकता तयार होत जातो.वर्तमान आणि भूत यांचं अस्तिव टिकून राहण्यासाठी भविष्यकाळाला यावेच लागते.या तिन्हींच्या चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसाला नेमके कुठे असावे याविषयी खात्रीच येत नाही.                                 पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या एकसलग वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.नद्यांचे हे वाहणे हे आपल्या सगक्यांच्या आयुष्यासारखे आहे.उगमापासून ते समुद्रापर्यंत चाललेला हा प्रवास अविरतपणे सुरू असतो.पण या प्रवासाच्या कोणत्या भागाला जगणे म्हणायचे असा प्रश्न आपल्याला वारंवार पडत राहतो.भूतकाळात रममान होऊन तसे काहीच हाती लागत नाही.भविष्यकाळ हातात नसल्याने त्यात गुंग होऊनही हाती काहीच येत नाही .हे सगळे सिध्दांताच्या पातळीव...

तोचि एक महा"मानव".....

इमेज
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर...                              "ती शून्यामधली यात्रा |                          वाऱ्यातील एक विराणी ||                    गगनात विसर्जित होता |                           डोळ्यात कशाला पाणी" || “सात कोटी अस्पृश्य आजच्या दिवशी १९५६ साली पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्यांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडक...

स्टेटस....

इमेज
स्टेटस....                               तसा हा सोशल मीडिया मुळे गेल्या 15 वर्षांपासून चर्चित असलेला इंग्लिश शब्द.पण तो जगभरातील अब्जाधीश माणसापासून ते गरीबातल्या गरिबांपर्यंत चिकटला.त्याचा मराठी अर्थ शोधला तर त्याचे बरेच अर्थ निघालेत.स्थिती, दर्जा, मनुष्याचे समाजातील कायदेशीर,नैतिक स्थान,असे अर्थ निघाले.पण ह्या अर्थाचा माणूस हा सहजासहजी घडत नसतो. असो...पण आजच्या 21 व्या विज्ञान युगात हा आज-काल सहज वापरला जाणारा शब्द म्हणजे स्टेटस. WhatsApp Facebook Status हे 30 सेकंदाचेच पण ते ठेवताना प्रत्येकजण 30 मिनिटे नक्कीच विचार करीत असेल. म्हणजे आपण कसे आहोत? हे आपल्या Contact List मधील सर्वांना दाखवण्याची ही धडपड. त्याचबरोबर आपले समाजात एक Status असते, ते जपण्यासाठी आपण किती धडपड करतो. आपण सर्वांचा आदर्श असावे, समाजामध्ये मानाचे एक स्थान असावे असे सर्वांना वाटत असते. जो तो आपल्यापरीने प्रयत्न करीत असतोच. काहीजण आपले Status हे पैशावर मोजत असतात, काहीजण समाजातील केलेल्या कार्यावर मोजतात. यात मतभिन्नता असणे...

#हातरस अत्याचाराचा निषेध

स्वर्गीय मनीषा वाल्मिकी हिला अभिवादन करून.....   स्त्री सन्मानासाठी रामायण ,महाभारताचा दाखला देणार्यांनी हे लक्षात ठेवावं की,त्याच महाभारतात एका स्त्री ला जुगारावर लावणारे..तिच्या वस्त्रहरनाची मानवतेला काळिमा फासणारी घटना पाहणारे..खरंतर तिच्यासाठी लढले की सत्तेसाठी? आणि रामायणाचे यापेक्षा काही वेगळे नाही हो..यात सीतेला न्याय मिळाला म्हणता येईल कदाचित कारण नंतर तिला सुद्धा मरण यातना सहन कराव्या लागल्या..पण,सीतेसाठी लंकेवर चालून गेलेल्यांनी अगोदर रावणाच्या बहिनीचे नाक कापले होते..ती स्त्री नव्हती का?..सीतेचे अपहरण करणाऱ्याला रामा न ठार केलं..सीतेला न्याय मिळाला..पण रावणाच्या बहिणीला अजून न्याय मिळाला का ?..नाही.. बहुदा ती दलित असावी...😢 #हातरस अत्याचार निषेध अमोल भोसले

"गड आला पण सिंह गेला": डॉ. नरेंद्र दाभोलकर

इमेज
            या देशाला महाराष्ट्राने फार अनमोल रत्न दिलीत.त्या अनमोल रत्नानीच या देशाला ,या महाराष्ट्राला आकार ,उकार दिला.त्या अनेक रत्नापैकी एक कोहिनूर होता तो म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर . भाषणाची सुरवात कार्ल मार्क्स च्या "धर्म ही अफूची गोळी आहे".असे करून श्रध्दा आणि अंधश्रद्धा यांचा सविस्तर पाढा सादर करत.            अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला. अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी डॉ. नरेंद्र दाभोलकर सर्वात धाकटे अपत्यं.डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्‍यातील  न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. पूढे सांगली येथील “विलिंग्डन महाविद्यालया”तून त्यांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्य...

रक्षाबंधन...

इमेज
रक्षाबंधन...... रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे. स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.          बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही,...