पोस्ट्स

"2021: World Environment Day"

इमेज
    "The Environment & the economy are really both two sides of the same coin.If we cannot sustain the environment, we cannot sustain ourselves."                         - Wangari Ma a thai          World Environment Day is celebrated every year on June 5 globally. It is a day on which we spread awareness about the environment and the need to conserve it. Moreover, it is essential to advocate for a greener environment and conservation of nature. It is quite simple as when we conserve the environment today, the future generations will be able to lead a healthier life. We cannot be so selfish and use up all the resources for ourselves. This  Day is the perfect opportunity to make people aware of the issues we are facing and how one can contribute to saving it. Thus, it is quite important in its own way.     World Environment Day reminds us to strengthen the world and ensure that nature is preserved at all costs. It throws light on the causes which are causi

"आतला ज्वालामुखी......"

इमेज
"आतला ज्वालामुखी "              संपूर्ण प्रयत्न केले असता यश मिळते अस आपण आजपर्यंत खूपदा ऐकत आलो.पण संपूर्ण प्रयत्न म्हणजे नेमके किती प्रयत्न हे मात्र अचूकपणे सांगितले जात नाही.अर्धवट प्रयत्न केले असता यश मिळत नाही हे ही खरंच आहे.पण आपण करीत असलेले प्रयत्न कोणत्या मर्यादेपर्यंत अपूर्ण असतात आणि कोणत्या मर्यादेनंतर पूर्ण होतात हे समजणे  म्हणजे यशाची गुरुकिल्ली सापडण्यासारखेचं आहे.     आपण इयत्ता 5 पाचवी नंतर भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलो आहेत की पृथ्वी च्या गर्भात अत्यंत तप्त असा शिलारस सदैव फिरत असतो.हा रस सतत पृथ्वी च्या पृष्ठभागावर येण्यासाठी धडपडत असतो.त्यासाठी आतून एकसारखे धक्के देत असतो.जेव्हा त्याचे प्रयत्न यशस्वी होतात तेव्हा तो ज्वालामुखीच्या रूपाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर अवतीर्ण होतो.त्याचे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलेले यशस्वी रूप आपल्याला लाव्हारसाच्या रूपाने दिसते. पृथ्वीच्या आतून ज्वालामुखीच्या रूपाने बाहेर येण्यासाठी तप्त शिलारसाची चाललेली ही धडपड प्रत्येक वेळी यशस्वी होतेच अस नाही. जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हा तो रस आतल्या आतच 

युगप्रवर्तक छत्रपती......

इमेज
                इतिहासाचा एक आंधळा अभिमान हा एक शाप आहे.तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे.इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे.या भूमिकेतून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे नवल नाही.महाराजांचे चरित्र चिंतन हा अनेकांच्या अभिमानाचा,जिव्हाळ्याचा विषय आहे.अनेक देशभक्त ,समाजसेवक,राजकारणी,संशोधक,आणि आपल्या सारखे जनसामान्य यांना सुद्धा महाराज प्राणप्रिय आहेत याला अपवाद नाही.300 वर्षांपूर्वी महाराजांनी देहत्याग केला तरी त्यांचा किर्तीदेह महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात अजूनही तेजाने तळपतो आहे.          छत्रपती शिवराय यांचे जीवन हे अनेकांच्या जीवनाचे विधान आहे .अनेकांचे ते स्फुर्ती स्थान आहे. या श्रीमंतयोगींचे आज स्मरण करताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.महाराजांचा इतिहास सगळ्याना अगदी तारखेनुसार पाठ आहे.महाराज जन्माला आले ते एका गडावर अन या जगाचा निरोप घेतला तो दुसऱ्या गडावर.महाराष्ट्र्याच्या गडकोटांनी महाराजांच्या आयुष्याला एक भौगोलिक अन सांस्कृतिक विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून दिल.महाराजांच्या जीवनावर अनेकांनी ग्रंथ लिहले,सिनेमे काढले,पुतळे उ

चला झाड होऊया........

इमेज
चला झाड होऊया.....                 तीन आठवड्यापूर्वी गावाकडे STबस ने यायचा योग्य आला.हा रस्ता तसा गेली अनेक वर्षे माझ्या पाहण्यातला अन ओळखीचा आहे.यावेळी जाताना सोबत ओळखीचं दुसरं कोणीच नव्हते.सगळे प्रवाशी माझ्यासारखेच प्रवासाला निघाले होते.प्रत्येक जण आपआपल्या मोबाईल मध्ये व्यस्त होता...क्वचितच गप्पा होत होत्या.मग मी सुद्धा बसमधून   आजूबाजूला पाहत होतो.सकाळी लवकर निघाल्यामुळे वातावरण एकदम ताजतवानं होतं. त्यामुळे निसर्गाच्या दिवसाची सुरुवात पाहणं हाच माझ्यासाठी एक पर्याय उरला.                    प्रत्येक गावाच्या रस्त्यावर शेती, छोटी मोठी हॉटेल्स यांच्या बरोबरीने ठळकपणे जाणवणारी एक बाब म्हणजे वडाची झाडे.गेली अनेक वर्षे मी ही झाडे पाहतोय.आज ती पाहताना मनात सहज एक विचार आला की ही झाडे कोणी लावली असतील? किती वय असेल यांचे? अजून किती वर्षे ही टिकतील? विचार करता करता ध्यानात आले की या झाडांचे वय माझ्या आजी आजोबांच्या वयापेक्षा नक्कीच जास्त असेल.पुढे मी हयात नसलो तरी ही झाडे असणारच आहेत.              वडाच्या झाडाच्या दीर्घायुष्य असण्याचे नेमकं रहस्य काय? मुळात वडाची झाडे न लावत

प्रवाह ....

इमेज
              प्रवाह...                      भूतकाळ,वर्तमान काळ आणि  भविष्य काळ अशा तीन टप्यात आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची विभागणी होते. जिथे वर्तमानकाळ अस्तित्वात आहे  तिथे भूतकाळ न चुकता तयार होत जातो.वर्तमान आणि भूत यांचं अस्तिव टिकून राहण्यासाठी भविष्यकाळाला यावेच लागते.या तिन्हींच्या चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसाला नेमके कुठे असावे याविषयी खात्रीच येत नाही.                                 पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या एकसलग वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.नद्यांचे हे वाहणे हे आपल्या सगक्यांच्या आयुष्यासारखे आहे.उगमापासून ते समुद्रापर्यंत चाललेला हा प्रवास अविरतपणे सुरू असतो.पण या प्रवासाच्या कोणत्या भागाला जगणे म्हणायचे असा प्रश्न आपल्याला वारंवार पडत राहतो.भूतकाळात रममान होऊन तसे काहीच हाती लागत नाही.भविष्यकाळ हातात नसल्याने त्यात गुंग होऊनही हाती काहीच येत नाही .हे सगळे सिध्दांताच्या पातळीवर कुठूनही प्रत्यक्ष जगताना मात्र नेमकेपणाने वळत नाही.                         कुठल्याही नदीच्या प्रवाहात जेव्हा जेव्हा आपण उतरतो तेव्हा तेव्हा ती नदी पुर्णतः नवीनच असते.कालचीच नदी

तोचि एक महा"मानव".....

इमेज
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर...                              "ती शून्यामधली यात्रा |                          वाऱ्यातील एक विराणी ||                    गगनात विसर्जित होता |                           डोळ्यात कशाला पाणी" || “सात कोटी अस्पृश्य आजच्या दिवशी १९५६ साली पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्यांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.” “आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली ‘भीमा’ची गदा

स्टेटस....

इमेज
स्टेटस....                               तसा हा सोशल मीडिया मुळे गेल्या 15 वर्षांपासून चर्चित असलेला इंग्लिश शब्द.पण तो जगभरातील अब्जाधीश माणसापासून ते गरीबातल्या गरिबांपर्यंत चिकटला.त्याचा मराठी अर्थ शोधला तर त्याचे बरेच अर्थ निघालेत.स्थिती, दर्जा, मनुष्याचे समाजातील कायदेशीर,नैतिक स्थान,असे अर्थ निघाले.पण ह्या अर्थाचा माणूस हा सहजासहजी घडत नसतो. असो...पण आजच्या 21 व्या विज्ञान युगात हा आज-काल सहज वापरला जाणारा शब्द म्हणजे स्टेटस. WhatsApp Facebook Status हे 30 सेकंदाचेच पण ते ठेवताना प्रत्येकजण 30 मिनिटे नक्कीच विचार करीत असेल. म्हणजे आपण कसे आहोत? हे आपल्या Contact List मधील सर्वांना दाखवण्याची ही धडपड. त्याचबरोबर आपले समाजात एक Status असते, ते जपण्यासाठी आपण किती धडपड करतो. आपण सर्वांचा आदर्श असावे, समाजामध्ये मानाचे एक स्थान असावे असे सर्वांना वाटत असते. जो तो आपल्यापरीने प्रयत्न करीत असतोच. काहीजण आपले Status हे पैशावर मोजत असतात, काहीजण समाजातील केलेल्या कार्यावर मोजतात. यात मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे. पण मला वाटते पैसा इज्जत देतो पण आणि काढतो पण. आपण चांगले कार्य