पोस्ट्स

सौंदर्य....

जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य सर्वत्र आहे तेव्हा आपल्याला असे म्हणायचे नसते की कुरुपता हा शब्द भाषेतून नाहीसा केला पाहिजे. असे म्हणणे म्हणजे असत्य असे काही नसते असे म्हणण्याइतकेच मूर्खपणा चे ठरेल.असत्य हे खात्रीने अस्तित्वात आहेच,पण ते विश्वाच्याप्रणालीत असत नाही तर ते आपल्या आकलनाच्या क्षमतेत त्यातील नकारात्मक भाग म्हणून असते.याचं पध्दतीने आपल्याला झालेल्या सत्याच्या अर्धवट साक्षात्कारामुळें आपल्या जीवनातून व आपल्या कलातून सौन्दर्याची विकृत अभिव्यक्ती होते आणि त्यामुळे आपणास कुरुपता येते.काही प्रमाणात आपण जे आपल्यात आहे, आणि जे इतर सर्वात आहे अश्या सत्याच्या नियमांच्या विरोधात आपले जीवन मार्गस्थ करू शकतो आणि त्याचप्रमाणे सार्वत्रिक असलेल्या सुसंवादाच्या शाश्वत नियमाला उलटे फिरवत कुरुपता निर्माण करू शकतो. अमोल नंदा शिवाजी भोसले.

"बुद्ध हसत आहे".....

इमेज
            "बुद्ध हसत आहे"....  "अर्थहीन वादविवादापेक्षा  अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते".                                         - गौतम बुद्ध इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात असलेली गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था ध्वस्त करु पाहणार्‍या साम्राज्यवादी शक्तींना बळकटी प्राप्त होऊ लागली. भौतिक, सामाजिक, राजकीय व वैचारिकदृष्टया संपन्न अशी ही गणराज्यं ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ या उक्तीनुसार आपापसात संघर्ष करत, साम्राज्यवादी एकाधिकारशाही प्रवृत्तीला बळी पडत होती. दुसर्‍या बाजूला तत्कालीन वैदिक धर्म स्वतःच्या निर्माण केलेल्या अभेद्य तटबंद्यांमध्ये अडकून पडला होता. धर्म म्हणजे कर्मकांड आणि समाज म्हणजे न बदलता येणारी जातीय उतरंड असा समज वैदिक धर्ममार्तडांनी दृढमुल केला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात होता. एकूणच राजकीय असो वा धार्मिक अशा दोन्ही स्तरांवर क्रौर्य, व्यभिचार आणि अविवेक यांनी समाजाला ग्रासले असतांना,‘करूणा-शील-प्रज्ञा’ हा महामंत्र देणार्‍या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. कपिलवस्तूच्या या शाक्यवंशीय राजपुत्राने जगातील पहिल्या विश्व

"आधुनिक महाराष्ट्राचा उत्तुंग हिमालय:लोकराजा राजर्षी शाहू महाराज".

इमेज
"आधुनिक महाराष्ट्राचा उत्तुंग हिमालय:लोकराजा राजर्षी शाहू महाराज". महाराष्ट्र ही संताची, राष्ट्रनायकांची, क्रांतिवीरांची, सामाजिक  झटणा-ऱ्या सुधारकांची आणि मानवतेच्या मूल्यांची स्थापना करण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची, विचारवंताची भूमी राहिलेली आहे. याच भूमीमध्ये प्रागतिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली, विकसित झाली, प्रसरण पावली आणि अधोगामी विचारधाराही निपजली. प्रत्येक वेळी प्रागतिक विचारधारेची सरशीच झाली असे नव्हे; परंतु महाराष्ट्रातील जनतेने प्रागतिक विचारांना बळ देण्याचे काम केले. इतिहासाच्या पानापानांवर गर्दी करून राहिलेल्या घटनांमध्ये, सुवर्णाक्षरांनी नोंदवाव्यात अशा काही व्यक्ती व घटना आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचे एकजीव असे समाजमन घडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला.आणि या आधुनिक महाराष्ट्राला सुंदर राजमहाल ज्या अनेक क्रांतिकारक कार्यातून झाला;  त्या अनेक शिल्पकारांपैकी एक  महत्त्वाचे नाव म्हणजे, कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज होत. छत्रपती राजर्षी शाहूंनी ज्या काही समाजपरिवर्तनाच्या चळवळी बांधल्या, विकसित केल्या; किंबहुना त्यांना आर्थिक, राजकीय

हॅलो प्रीतम.....

इमेज
           Hello प्रीतम.....            ती शून्यमधली यात्रा,             वाऱ्यातील एक विराणी,              गगनात विसर्जित होता,               डोळ्यात कशाला पाणी....   प्रिय प्रीतम,                   काही काही प्रसंग बोलायला जेवढे अवघड असतात तेव्हढेच सांगायला सुद्धा जड जातात. आजच्या तारखेला बरोबर एका वर्षांपूर्वी तू आम्हांला सोडून गेलास.तुझं जाणं हे अगदी मनाला चटका लावणार, अन माझ्यासाठी धक्कादायक होतं.मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर निघून जाशील.पण काळाचे अन नियतीचे दरवाजे कधी कुणासाठी एकदम उघडतील हे ज्याच्या त्याच्या नशिबाला माहीती. तो दरवाजा कुणाच्या आयुष्यात सोनेरी सकाळ घेऊन येतो तर कुणाच्या आयुष्यात कुट्ट काळरात्र....पण तुझ्या बाबतीत दैवाचे फासे उलटे फिरले अन माझ्या लाडक्या मित्राला आमच्यापासून हिरावून घेतलं.   तशी तुझी माझी मैत्री ही झाली ती तुझ्या कॉलेज मध्ये ऑल युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट compition मध्ये. त्यावेळी त्या प्रोजेक्ट compition मध्ये आमचा 1ला अन 2रा क्रमांक आला होता.त्यावेळी तुझा जो काही compition मध्ये मी पाहिलेला सहभाग होता तो खू

"मराठी भाषा दिन आणि भाषाभ्रम"....

इमेज
    "मराठी भाषा दिन आणि भाषाभ्रम..."   सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांची आजच वाचण्यात आलेली एक सुंदर कविता आपल्या मराठी भाषेची  आपल्या सोबतची नाळ जोडते ती अशी...           "अलवार कधी तलवार कधी,             पैठणी सुबक नऊवार कधी..             जणू कस्तुरीचा दरवळ दैवी,             ती सप्तसुरावर स्वार कधी..             डोलत फडकते रायगडी,             नाचते कधी ती भीमेकाठी..            ही माझी माय मराठी.                   १९९९ मध्ये विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षें झाली.  वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून आपण जगाला हे सांगत असतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे. इत:पर हिचे पांग आम्ही फेडू शकत नाही. एक जिवंत भाषा म्हणून तिच्या संवर्धनाचा, आधुनिकीकरणाचा वसा आम्ही टाकून दिला आहे. भाषा दिन साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील गोष्टी आहेत. इंग्र

*कलेक्टर तुम्ही मेकअप का करत नाहीत...❓*

*मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती.  राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला*.   .................................... तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही.     भाषण इंग्रजीत आहे.  ती फक्त एक-दोन मिनिटेच बोलली, पण तिचे शब्द दृढनिश्चयाने भरलेले होते.   त्यानंतर मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले.   *प्रश्न: तुझे नाव काय आहे?*   माझे नाव राणी आहे.  सोयामोई हे माझे कौटुंबिक नाव आहे.  मी झारखंडची रहिवासी आहे.   *अजून काही विचारायचे आहे?.* प्रेक्षकांमधून एक सडपातळ मुलगी उभी राहिली.   विचार, मुली.  "मॅडम, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप का वापरत नाही?" कलेक्टरचा चेहरा अचानक फिका पडला.  तिच्या पातळ कपाळावर घाम फुटला.  तिच्या चेहऱ्यावरचे हसू ओसरले.  श्रोते अचानक शांत झाले. तिने टेबलावरची पाण्याची बाटली उघडली आणि थोडे प्यायले.  मग तिने मुलाला बसायला इशारा केला. मग ती हळूच बोलू लागली. मुलाने गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला.  एका शब्दात उत्तर देता येणार नाही, अशी गोष्ट आहे.  उत्तर

मनाचा तळ......

                                मनाचा तळ......        "एकूण मनाचा खेळ तसा खुप सुंदर असतो. कोणत्याही अवयवाच्या रुपात तो कधी सापडलाच नाही. देवाने कदाचित निर्माण केला असता तर सगळ्यांना प्राप्त झाला असता.पण मन खूपच सुंदर असतं.माणूस सारं सारं आपल्या मनांत भरत असतो. सुख दुःख, तृष्णा,संपती, चांगलं ,वाईट,वेदना आणि खंत सुद्धा.त्यामुळेच जगातलं सर्वसंपन्न, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान  असं ठिकाण म्हणजे मन.म्हणूनच आपण नेहमी म्हणत असतो की ,एकदा का माझ्या मनात आलं ना..की मी ती गोष्ट सोडतच नाही. मनांत येणं याचा असाही अर्थ होऊ शकतो की प्रचंड ऊर्जा प्राप्त करणं...प्रचंड निर्धार करणं आणि कृतीच्या पातळीवर जाणं."                                                 अमोल भोसले.